फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ॲड. कांचनकन्होजा खरात यांचे शिक्षण बी.एस.सी. (मायक्रोबायोलॉजी), एम.एस.सी (व्हायरॉलॉजी), डी.एम.एल.टी., डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, एल.एल.बी. (स्पेशल), एल.एल.एम (क्रिमिनल लॉ) असे झाले आहे.
मतदारसंघातील वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, नवीन उद्योगधंदे व एमआयडीसी मंजूर करून आणणे तसेच मेडिकल कॉलेज व प्रशस्त सरकारी दवाखाना आणणे. महिला, निराधार, अंध,अपंग, व्यक्तींच्या प्रगतीसाठी व संरक्षणासाठी ठोस उपाययोजनांसह अन्य विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून जनतेने त्यांना निवडून द्यावे असे आवाहन खरात यांनी केले आहे.