
फलटण : सासकल ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दीपाली चांगण यांची तर उपाध्यक्षपदी दिनेश मुळीक यांची निवड झाली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य हणमंत मुळीक, अनिल मुळीक, शंकर मुळीक, नामदेव मुळीक, संदीप फडतरे, संगीता खोमणे, निकिता घोरपडे, संगिता देवघारे, वैशाली मुळीक, अमृता कवितके या शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते विनायक मदने, माधुरी मदने, शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, शिक्षक पांडुरंग निकाळजे, सहशिक्षक सुधीर ढालपे, रुपाली शिंदे, संध्या गोरे यांची उपस्थिती होती.
सदर निवडीबद्दल दोघांचे सरपंच उषा फुले उपसरपंच सोनाली मदने, ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

