जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज फलटण येथे शोकसभा

फलटण : सामाजिक चळवळ व पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्यावतीने आज बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.२३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे सदर शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे फलटण तालुकाध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य, ज्येष्ठ पत्रकार व गेली ३०/३५ वर्षे वृत्तपत्र क्षेत्राबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रा. रमेश आढाव सर यांचे दि. १८ जुलै रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला फलटण शहर व तालुक्यातील सर्व समाज घटकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!