कार्यकर्ते घडण्यासाठी अभ्यास वर्ग आवश्यक : दिलीप पाटील ; वडूज येथे जागृत ग्राहक राजाचा प्रांतीय अभ्यास वर्ग उत्साहात

फलटण : समाजातील कोणतेही क्षेत्र असो, तेथील यश हे संस्कारीत कार्यकर्त्यांवर अवलंबून असते, आणि संस्कारित कार्यकर्ते घडण्यासाठी कार्यकर्ता अभ्यास वर्ग अत्यंत आवश्यक आहेत असे प्रतिपादन जागृत ग्राहक राजा संस्थेचे राज्य अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले.
संस्थेच्या वतीने वडूज, ता. खटाव येथे आयोजित प्रांत स्तरीय अभ्यास वर्गात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका व जागृत ग्राहक राजाच्या महिला उपाध्यक्षा डॉ. साधना पाटील म्हणाल्या, सामाजिक कार्यात महिला कार्यकर्त्यांनी संघटित होऊन पारंपारिक विचार जपत, आधुनिक विचार स्वीकारून अन्याया विरुद्ध सनदशीर मार्गाने उभे राहिले पाहिजे. सकारात्मकता जपली पाहिजे, व्यसनाधीनतेला विरोध करून महिला कार्यकर्ती म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे.
जागृत ग्राहकचे पुणे विभाग संघटक बाळासाहेब घोगरे म्हणाले, संघटनेचा आत्मा कार्यकर्ता असतो, परंतु समाजात त्याची ओळख संघटनेमुळे असते, त्याची प्रत्येक कृती ही समाजात संघटनेची कृती मानली जाते, हे लक्षात घेऊन कार्यकर्त्याने आपले आचार आणि वर्तन केले पाहिजे.
पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर म्हणाले, समाजातील सेवाभावी संघटना या समाजाला न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावतात, म्हणूनच समाज समाधानाने जगू शकतो. यासाठी ज्यांना समाज सेवेची आवड आहे व काही विधायक कार्य करण्याची आवड आहे, अश्या कार्यकर्त्यांनी थोडी झळ सोसून संघटन उभे केले, तरच शक्तीशाली संघटना उभी राहील.

राज्य संघटक दिलीप फडके म्हणाले, बरेच वेळा कार्यकर्त्याने नेमके काय आणि कसे काम करावे हे माहिती नसते. तेव्हा आपण समाजात वावरताना समाजात घडणाऱ्या घटना व त्यातील त्रुटी, उणीवा शोधाव्यात, थोडा कायद्याचा अभ्यास करावा, लेखनी आणि कागद ही शस्त्रे वापरून प्रशासनाकडे दाद मागावी. आपला अभ्यास व कार्यातील प्रामाणिकपणा पाहून प्रशासन सुद्धा आपणास छान प्रतिसाद देते व प्रश्न मार्गी लागतो.
मुक्त चिंतन कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी, संघटनेकडून अपेक्षा, कार्यकर्त्यांची क्रियाशीलता, चारित्र्य, जबाबदाऱ्या व विविध उपक्रम याविषयी आपली मते मांडली.
दरम्यान जागृत ग्राहक राजाच्या अभ्यास वर्गास खटाव,माण तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, रुपेश कदम, शरद कदम, आयाज मुल्ला, मुन्ना मुल्ला, शशिकांत धुमाळ, समीर तांबोळी, दत्ता इनामदार यांनी सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खटाव तालुका महिलाध्यक्ष डॉ. नूतन फडणीस यांनी,”हे भगवान मुझे दुनियाकी सेवा का वरदान दे” ही सामूहिक प्रार्थना म्हटली.
प्रास्ताविकात राज्य सचिव प्रा. नागनाथ स्वामी यांनी जागृत ग्राहक राजा संघटनेची उद्दिष्टे, कार्य पद्धती व अभ्यास वर्गाची आवश्यकता स्पष्ट केली. सूत्रसंचालन सातारा जिल्हा सचिव प्रा. सतीश जंगम यांनी तर आभार प्रदर्शन पुणे महानगर अध्यक्षा दुर्गाताई शुक्रे यांनी केले.
कार्यक्रमास कोषाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी, राज्य सहसचिव अनंत खोचरे, सांगली जिल्हाध्यक्ष राहुल पाटील,नवनाथ बांदल, माधवराव गावडे, हरीश फडतरे, अंकुश वीर विलास मादगुडे, सुभाष मावकर, नितीन मिंडे, शत्रुघ्न घाडगे, सचिन शिर्के,प्रकाश शिंदे, बाळासाहेब देसाई, निलेश बांडे, डॉ. नूतन फडणीस, बचाराम साबळे, राकेश सोनटक्के, संगीता लोहार, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत काळे व पुणे, सांगली सातारा जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते.
अभ्यास वर्ग यशस्वी करण्यासाठी विनोद लोहार, ऍड शीतल साळुंखे, सचिन जाधव, मुन्ना मुल्ला, राकेश सोनटक्के, दत्ता इनामदार व जागृत कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!