
फलटण : व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गामधील गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन सातारा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम.एम. पवार यांनी केले आहे.

अनुदान योजना ही ५० हजार पर्यंत असून त्यामध्ये २५ हजार रुपये अनुदान म्हणून व २५ हजार पर्यंत बँक कर्ज लाभार्थ्याला दिले जाते. बीज भांडवल योजनेमध्ये ५० हजार पासून ते पाच लाखांपर्यंत कर्ज असून बँकेची रक्कम ७५ टक्के, लाभार्थीचा सहभाग ५ टक्के, महामंडळाचे बीजभांडवल २० टक्के, अनुदान ५० हजार रुपयेचा समावेश आहे. थेट कर्ज योजना ही एक लाख रुपयांची असून महामंडळाची बीज भांडवल रक्कम ७५ हजार असून २० हजारपर्यंत अनुदान दिले जाते, यात लाभार्थ्यांच्या हिस्सा ५ टक्के असावा लागतो.
या सर्व योजनांसाठी अर्जदारांनी https://mahadisha.mpbcdc.in या वेबसाईट वर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टारंट उड्डाणपुलाजवळ सातारा, दुरध्वनी क्र. ०२१६२ – २९८१२६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

