जप्त वाहनांचा २५ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहिर ई-लिलाव

फलटण : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविधि गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या व मोटार वाहन कर न भरलेल्या व वाहनांवर हक्क सांगून सोडवून न घेतलेल्या २७ वाहनांचा जाहिर ई-लिलाव ऑनलाईन पद्धतीने www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर दि. २५ जुलै रोजी ठेवण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
वाहन मालक, चालक, वित्तदाते, तसेच वाहनाशी हितसंबंध असणाऱ्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत हजर राहून लेखी हरकत पुराव्यासह सादर करावी. अन्यथा यानंतर कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येणार आहे. वाहने सोडवून घेण्यासाठी ही अंतिम संधी असणार आहे, त्यामुळे आपली वाहने सोडवून घ्यावीत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तालुक्याच्या तहसिल कार्यालयात सूचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात येणार आहे. लिलाव यादीतील एकूण २७ वाहने www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर लिलावाकरिता उपलब्ध असून प्रचलित असलेल्या व प्रसिद्ध होणाऱ्या अटी व शर्ती या लिलावाकरिता लागू असणार आहेत. सदर वाहनांची विक्री भंगार (स्क्रॅप) म्हणून करण्यात येणार आहे. लिलावाकरिता नोंदणी प्रत Registered Vehicle Scrapping Facility (RSVF) संस्था यांना सहभाग घेता येणार आहे. जाहीर लिलाव रद्द करण्याची अथवा कोणतेही कारण न देता तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी सातारा यांनी स्वत: कडे राखून ठेवले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा या कार्यालयाकडून लिलावातील अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या बाबतीत बोजा असलेल्या सर्व बँक पतसंस्था, फायनान्स यांनी वाहनांचा जाहीर ई-लिलावापूर्वी पाच दिवसाच्या आत आपले म्हणणे असल्यास त्वरीत या कार्यालयाशी संपर्क साधावा अन्यथा लिलाव प्रक्रीयेनंतर आपले कोणतेही म्हणणे ग्राह्य धरले जाणार नाही, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!