केंद्र पुरस्कृत योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाईन तयार करण्याचे आवाहन

फलटण : सातारा तालुक्यातील केंद्र पुरस्कृत योजनेतील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ, विधवा, दिव्यांग योजनेतील लाभ घेत असलेले लाभार्थी यांनी हयात दाखल्याबाबत Benficiary Satyapan App विकसित केले आहे. तसेच AadharFaceRD App व्दारे केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांचे Digital Life Certificate (DLC) म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन तयार करावयाचे आहे. सदरचे प्रमाणपत्र generate करण्याची कार्यवाही आपल्या नजीक असणा-या महा ऑनलाईन किंवा आपले सरकार सुविधा केंद्रामध्ये जावून तात्काळ करावी. तरी सदरचे हयात प्रमाणपत्र तयार न झाल्यास लाभ बंद होईल. अधिक माहितीसाठी तहसिल कार्यालय सातारा (संजय गांधी शाखा) शाखा येथे संर्पक साधावा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!