
फलटण : पुणे शहराचे उपनगर अशी ओळख असलेल्या लोहगाव ता. हवेली येथे श्री नामदेव महाराज शिंपी समाज चॉरिटेबल ट्रस्टची स्थापना नव्याने करण्यात आली आहे. ट्रस्टच्या अध्यक्षपदी मनोज हेंद्रे, सचिवपदी शितल लंगडे तर खजिनदारपदी पांडुरंग कोळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
शिंपी समाज बांधवांसह व अन्य समाजासाठीही ट्रस्टच्या वतीने विविध बहुपयोगी, सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये महेंद्र सटाले, महेश डोंगरे, जगदीशकुमार राठोड, पदमराज ढवळे, बाळासाहेब वनारसे, ऋषिदर वनारसे यांचीही निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.
