
फलटण : प्रियदर्शनी दत्तक योजनेअंतर्गत राबवले जाणारे उपक्रम निश्चितपणे स्तुत्य आहेत, ते इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील. आपले ही सहकार्य या योजनेस निश्चितपणे आपले सहकार्य राहील अशी ही ग्वाही महाराजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व पत्रकार युवराज पवार पवार यांनी दिली.
फलटण येथील श्री सदगुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेमध्ये प्रियदर्शनी दत्तक योजनेअंतर्गत मुलींना मोफत स्कूल बॅग वह्या इत्यादी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सदगुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले होते.
यावेळी बोलताना दिलीपसिंह भोसले म्हणाले, प्रियदर्शनी दत्तक योजनेअंतर्गत गरजू व गुणवंत सुमारे शंभर मुलींना दरवर्षी शालोपयोगी साहित्य, गणवेश तसेच मेडिकल उपचार व मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी अंतर्गत जे उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमाचाही लाभ या मुलींना दिला जातो. आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व उपस्थितांचे आभार मानले. सौ. रुपाली सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश पाठक, शिक्षक, पालक व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
