
फलटण : आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेल आयुष विभाग यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘योगरत्न’ पुरस्काराने फलटण येथील प्रसिद्ध योग प्रशिक्षक सौ. विद्या सुनील शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सदर पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, उद्योजक मनोज दांडगे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष (आयुष विभाग) डॉ. नितीन राजे पाटील, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉ. सतीश कराळे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्रा. कुणाल महाजन, मनोहर कानडे आदींसह आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, राज्यातील योगशिक्षक, योग थेरपीस्ट यांची उपस्थिती होती.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या शिंदे यांचे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रिडासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.
