
फलटण : सध्या इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या टी.ई., बी.ई. आणि एम.ई. (Appearing) वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या इंटर्नशिपसाठी AICTE Internship Portal वरुन स्वतः विद्यार्थी (Student Login) लॉगिनचा वापर करुन २७ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिहे कठापूर उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अ.पं. निकम यांनी केले आहे.
इंटर्नशिप कालावधी सहा आठवडे असणार आहे. ही इंटर्नशिप मानधनाशिवाय असणार असून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड प्रकिया मुलाखतीनंतर केली जाईल. सातारा जिल्हा व इतर जिल्हयांमधील सातारा लगतच्या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच सध्या टी.ई., बी.ई. आणि एम.ई. मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. इंजिनिअरींग पासआऊट विद्यार्थ्यांना हि योजना लागू नाही. इंटर्नशिद्वारे सातार पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा व सातारा सिंचन मंडळ, सातारा यांच्या अंतर्गत चालणा-या विविध प्रकल्पांचे प्रत्यक्ष आणि क्षेत्रिय अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येईल.

