
फलटण : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी योग शिबिर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
२१ जून हा दिवस संपूर्ण विश्वभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. निरोगी शरीर तसेच स्वास्थ्य मनासाठी योगा अतिशय आवश्यक आहे. दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. या दिवशी योगासनाच्या फायद्याबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने व योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशालेच्या वतीने योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योग शिक्षिका सौ. उषा धुमाळ यांनी सूर्यनमस्कार, पद्मासन, गरुडासन, मयूरासन, वज्रासन अशा विविध योगासनांचे धडे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले.

प्रारंभी प्रभारी प्राचार्य पी.डी. घनवट यांच्या हस्ते योग शिक्षिका उषा धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ए.एस. तांबोळी व डी.आर. माने यांनी केले. आभार प्रा. जी.बी. वाघ यांनी मानले.

