
फलटण : मुधोजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मंडळ आणि आयक्यूएसी च्या संयुक्त विद्यमाने “आम्ही मुधोजीयन्स” हा स्नेह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते सध्यस्थिती पर्यंतचा आढावा घेऊन श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान त्याचबरोबर मुधोजी महाविद्यालयातील माजी प्राध्यापकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महाविद्यालयासाठी असलेले विविध प्रकारचे योगदान आणि सहकार्य यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनीही महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी ते उपाध्यक्ष पदापर्यंतची त्यांची स्वतःची झालेली वाटचाल सांगितली आणि एकूणच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी यांचेही वेगवेगळ्या प्रकारे कसे महाविद्यालयाला सहकार्य लाभले याविषयी आपल्या सहज शैलीतून आपले अध्यक्षीय मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पीएच कदम यांनी महाविद्यालयाच्या एकंदर वाटचाली संदर्भात आढावा घेऊन त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयाची कशी वाटचाल चालू आहे याचेही यावेळी दिग्दर्शन केले. या मेळाव्यात अनेक मान्यवरांची मनोगते झाली. त्यामध्ये महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र शहा, प्रा. एस. बी. इनामदार, प्रा विक्रम आपटे, प्रा. शंकरराव जगदाळे, प्रा सुधीर पिटके, प्रा. रतन फरतारे, उपप्राचार्य व्ही. एम. निंबाळकर, प्रबंधक शिवाजीराव रासकर यांच्यासह अन्य माजी प्राध्यापक व कर्मचारी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. टीपी शिंदे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी, तर सूत्रसंचालन प्रा डॉ. एएन शिंदे आणि प्रा. जेपी बोराटे यांनी केले. आभार उपप्राचार्य सौ. उर्मिला भोसले यांनी मानले.
कार्यक्रमास प्रा. वैद्य, प्रा. डॉ. मधुकर जाधव, प्रा. जीके मोरे, प्रा. ओजी कुलकर्णी, प्रा. रत्नपारखे, माजी ग्रंथपाल प्रा .जीजी पवार, मा. उपप्राचार्य पीव्ही कोरडे, प्रा. सुरेश ठोंबरे, प्रा. ज्ञानदेव देशमुख, प्रा. अलकनंदा परदेशी, प्रा. सुनिता जाधव, प्रा. मुजुमदार, प्रा. गुरव आदीसह अन्य माजी प्राध्यापक, उपप्राचार्य, कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

