
फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण मधील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या २०२५ बोर्ड परीक्षेमध्ये फलटण तालुक्यात सर्वात जास्त गुण मिळवून दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. सदर विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते व नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके ) यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण मधील बारावी शास्त्र शाखेमध्ये पार्थ जाधव हा विद्यार्थी ८६.६८ ℅ गुण मिळवून तर दहावीतील कु. प्रगती निंबाळकर ९७.६०% गुण मिळवून फलटण तालुक्यात प्रथम आले आहेत. तसेच फलटण तालुक्यात पार्थ नितीन जाधव याने NEET परीक्षेत ५८२ गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादित केला आहे. MHT-CET, JEE, NEET मार्गदर्शन वर्गामध्ये वेदांत सोनगिरे याने ९९•४५ % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. आदित्य नांदले याने MHT-CET परीक्षेत ९६.५२ % गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. वाणिज्य विभागातील सिद्धेश लाळगे याने अकाउंटन्सी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके ) तसेच प्रशालेचे प्रभारी प्राचार्य पीडी घनवट यांच्यासह विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

