
फलटण : राज्याच्या ६६ वा स्थापना दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून फलटण येथील जैन सोशल ग्रुपच्या वतीने फलटण बस स्थानकावर स्वच्छतेचे कार्य करणाऱ्या महिला कर्मचारी व शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून त्यांच्या समोर आकर्षक रांगोळी काढणारे बंडु अहिवळे व किराणा दुकानात गेली २० वर्ष प्रामाणिक सेवा करणारे अवचित ढेंबरे शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी फलटण आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे, स्थानक प्रमुख सुहास कोरडे, डाॅ. सुर्यकांत दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव निना कोठारी, संचालक प्रितम गांधी, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षा अपर्णा जैन आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल वाघमोडे यांनी कामगार दिनानिमित्त स्वच्छता करणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांचा सत्कार करने हा एक सुंदर उपक्रम असल्याचे नमूद करून जैन सोशल ग्रुपच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
सदर सत्काराबद्दल सर्वांच्या वतीने बंडु अहिवळे यांनी धन्यवाद व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपाल जैन यांनी, सूत्रसंचालन वृषाली गांधी यांनी केले. आभार निना कोठारी यांनी मानले.
