
फलटण ता. १ : महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते तर फलटण येथील अधिकार गृहाच्या प्रांगणात आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते प्रांत अधिकारी प्रियांका आंबेकर व तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी सर्व नायब तहसीलदार तसेच तहसील ऑफिस व प्रांत ऑफिस मधील अधिकारी कर्मचारी तलाठी मंडलाधिकारी स्वातंत्र्यसैनिक यांच्या पत्नी वीर माता उपस्थित होते. त्यांचा आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दरम्यान महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ध्वजवंदन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
