
फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी डॉ. शर्मिला इनामके, डॉ. सुनिता खराडे, डॉ. शैलजा कदम, प्राचार्य एस.बी. थोरात, उपप्राचार्य पी.डी. घनवट यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेमध्ये उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये जागतिक महिला दिन का साजरा केला जातो. समाजामध्ये स्त्रियांना असणारे अनन्य साधारण महत्त्व तसेच स्त्रियांचे आरोग व आहार, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ,आदर्श महिलांचे स्त्रियांच्या जीवनातील योगदान या विषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यावेळी कु.सलोनी जगताप या विद्यार्थिनीने महिला दिना निमित्ताने विचार व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. ए.एस. शिंदे यांनी, सूत्रसंचालन प्रा. जे. के. फडतरे यांनी केले. आभार प्रा. आर. एस. सस्ते यांनी मानले.

