
फलटण : सन २०२४ – २५ च्या ऊस गळीत हंगामात दि. १० फेब्रुवारी अखेर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, छ. संभाजीनगर, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती या ८ महसूल विभागातील ९९ सहकारी आणि १०१ खाजगी साखर कारखान्यांनी ७०१ लाख ९४ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन ६४४ लाख ४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.१८ % मिळाला आहे.
पुणे महसूल विभागातील १८ सहकारी आणि १३ खाजगी साखर कारखान्यांनी १६५ लाख ४४ हजार मे. टन ऊसाचे गळप करुन १५२ लाख ५२ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने
सातारा जिल्ह्यातील ९ सहकारी साखर कारखान्यांनी ३६ लाख ०८२ हजार ८९ मे. टन ऊसाचे गाळप करुन ४० लाख ३७ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ११.१९ % मिळाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील खालील सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण ३ लाख ९५ हजार ९१९ मे. टन गाळप झाले असून साखर उत्पादन ४ लाख ५३ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे, सरासरी साखर उतारा ११.५१ % मिळाला आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे ९ लाख ८ हजार ७३० मे. टन ऊस गाळप झाले असून १० लाख १२ हजार १८० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.०३% मिळाला आहे.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुईंज येथे ३ लाख ७४ हजार २८० मे. टन ऊस गाळप झाले असून ३ लाख ९७ हजार ८१० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.६२% मिळाला आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर येथे १ लाख ९० हजार ७५० मे. टन गाळप झाले असून २ लाख २५ हजार १०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.८ % मिळाला आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि., यशवंतनगर येथे ६ लाख १६ हजार ५०० मे. टन गाळप झाले असून ६ लाख ७९ हजार ९६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.९१ % मिळाला आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि., शेंद्रे येथे ४ लाख १४ हजार ३६० मे. टन गाळप झाले असून ४ लाख ६१ हजार ०५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.१५ % मिळाला आहे.
अथणी शुगर संचलित रयत सहकारी साखर कारखाना लि., शेवाळेवाडी येथे ३ लाख ९६ हजार ४२० मे. टन गाळप झाले असून ४ लाख ६९ हजार ३० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १२.०२ मिळाला आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना संचलित प्रतापगड सहकारी साखर कारखाना लि., कुडाळ येथे १ लाख ७७ हजार ४२० मे. टन गाळप झाले असून २ लाख १ हजार १०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.७४ % मिळाला आहे. खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., म्हावशी येथे १ लाख ३३ हजार ९१० मे. टन गाळप झाले असून १ लाख ३७ हजार ७२० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.०४ % मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यातील खाजगी साखर कारखाने
सातारा जिल्ह्यातील ८ खाजगी साखर कारखान्यांनी ४३ लाख ०६० मे. टन ऊसाचे गाळप करुन ३३ लाख ९५ हजार ०४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ७.८९ % मिळाला आहे. त्यामध्ये खालील खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी येथे ६ लाख ३५ हजार ६१० मे. टन झाले असून ३ लाख २७ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ५.०५ % मिळाला आहे. गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि., संचलित जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लि., चिमणगाव १३ लाख ४० हजार ५०० मे. टन गाळप झाले असून ११ लाख ३४ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.३९ % मिळाला आहे. जयवंत शुगर लि., धावरवाडी येथे ४ लाख ३२ घर ४६५ मे. टन गाळप झाले असून ३ लाख ८२ हजार १५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.९३ % मिळाला आहे.
ग्रीन पॉवर शुगर लि., गोपुज १ लाख ५० हजार ०७० मे. टन गाळप झाले असून १ लाख ६९ घर २५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.१२ % मिळाला आहे. स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लि., संचलित लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर साखर कारखाना, उपळवे येथे ४ लाख ३८ हजार ९१८ मे. टन गाळप झाले असून २ लाख २१ हजार ४३५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.०१ % मिळाला आहे. शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज लि., कापशी येथे ५ लाख ३६ हजार ७५७ मे. टन गाळप झाले असून ४ लाख २४ हजार १३५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.०४ % मिळाला आहे. शिवनेरी शुगर लि., गणेश टेकडी न्हावी बु. येथे ३ लाख ५५ हजार ४५० मे. टन गाळप झाले असून साखर उत्पादन ३ लाख ७७ हजार २३० क्विंटल झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.८३ % मिळाला आहे. खटाव माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग लि., पडळ येथे ४ लाख १० हजार ८९० मे. टन गाळप झाले असून ३ लाख ५७ हजार ९९० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.७८ % मिळाला आहे.

