
फलटण : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून लालपरीला ओळखले जाते. लालपरी टिकली तरच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता समाधानाने व सुरक्षित प्रवास करेल, म्हणून सुरक्षित प्रवासासाठी लालपरीला अर्थात सर्वसामान्यांच्या एसटी बसला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन प्रा. रविंद्र कोकरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील फलटण आगाराच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रविंद्र कोकरे बोलत होते. यावेळी प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे यांच्यासह फलटण आगारातील अधिकारी, चालक, वाहक, कर्मचारी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
