फलटण : कोल्हापूर विभागातील महत्वपूर्ण शैक्षणिक केंद्र असणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी वसंतराव कृष्णा शेडगे यांची मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी निवड करण्यात आली आहे.
शेडगे यांनी संस्थेच्या विविध शाखांमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ते विद्यमान उपाध्यक्ष आहेत. तसेच त्यांना सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
सदर निवडीबद्दल वसंतराव शेडगे यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम आदी मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.