फलटण : राजाळे (ता . फलटण) गावचे सुपुत्र प्रा. प्रविण जगन्नाथ निंबाळकर यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन महात्मा फुले साहित्य अकादमी पुणे यांच्यावतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावे दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
एस.एम.जोशी सभागृह येथे २३ जानेवारी २०२५ रोजी प्रा . प्रवीण निंबाळकर यांना पुरस्कार देताना माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे, युवा उद्योजक गणेश माने-देशमुख, आय.आर.एस विपूल वाघमारे, शिवाजी खांडेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. प्रवीण निंबाळकर हे सध्या हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोखळी (ता.फलटण) येथे कार्यरत आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे जयभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्यादी कदम, सचिव शारदादेवी कदम, विद्यालयाचे प्रा. सुनिल सस्ते यांच्यासह सहकारी शिक्षक, रसिक कला क्रिडा मंच, राजाळे आणि परिसरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.