फलटण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील फलटण आगाराच्यावतीने इंधन बचत मासिक कार्यक्रमाचा शुभारंभ व चालक दिनाचे औचित्य साधून चालकांचा सत्कार करण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळ प्रति वर्षी इंधन बचत मासिक कार्यक्रम राबवत असते, त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर चालक दिनाचे औचित्य साधून फलटण आगारातील चालकांचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
फलटण आगाराचे प्रभारी व्यवस्थापक राहूल वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या उपक्रमास यशवंतराव चव्हाण जूनियर कॉलेज फलटणचे प्रा. शंभूराज शिंदे व प्रा. धनंजय सस्ते, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक शुभम रणवरे, वाहतूक निरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास फलटण आगारातील चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.