विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

फलटण : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामडंळातंर्गत पै. कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, सातारा या कार्यालयामार्फत १ लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये १ लाख थेट कर्ज महामंडळामार्फत दिले जाणार आहे. लाभार्थीनी रु. २०२५/- चा नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यावर द.सा.द.शे ४ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.
अधिक माहितीसाठी महामंडळाचे सातारा जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ,बी बिल्डींग ,सर्व्हे नं २२अ, जुनी एम. आय.डी.सी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डानपुलाजवळ ,सातारा, दूरध्वनी क्रं. ०२१६२ – २९५०६८ येथे सपंर्क साधावा. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!