फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थिनी व क्रिकेटपटू कु. ऋतिका चतुरे हिची शिवाजी विद्यापीठ क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे.
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (महिला) स्पर्धा नुकत्याच मोहनलाल सुखदेव विद्यापीठ, उदयपूर, राजस्थान या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा महिला क्रिकेट संघ अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे, व या संघामध्ये ऋतिका चतुरे हिचा समावेश करण्यात आला आहे.
सदर निवडीबद्दल ऋतिकाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, निवृत्त प्राचार्य अरविंद निकम, प्राचार्य डॉ.पी.एच. कदम आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.