साहित्य व इतिहासाचे सखोल वाचन पत्रकारांना मार्गदर्शक ठरेल : संजीवराजे

फलटण : पत्रकार हे समाजातील वास्तव पत्रकारितेच्या माध्यमातून मांडतात, समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडतात. पत्रकारिता आणि साहित्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. चांगल्या व सकारात्मक पत्रकारितेसाठी व स्तंभलेखनासाठी पत्रकार बांधवांना साहित्य व इतिहासाचे सखोल वाचन मार्गदर्शक ठरेल असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
मुधोजी महाविद्यालय येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यामध्ये, प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच कदम, कला शाखाप्रमुख डॉ. ए. एन शिंदे, डॉ. पी.आर पवार, डॉ. बी.जी सरक आदींची उपस्थिती होती.
आज प्रिंट मीडिया पेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया हा जलद व तात्काळ वृत्तांकन करण्याचे महत्त्वपूर्ण साधन बनलेला असला तरी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून येणारे स्तंभलेख किंवा वैचारिक लेख ही खरी पत्रकारिता असून ती कधीही कालबाह्य होऊ शकणार नाही असे मत व्यक्त करून संजीवराजे म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून भारतीय प्रगल्भ लोकशाहीत त्याचे योगदान अत्यंत बहुमूल्य राहिले आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातूनच भारतीय स्वातंत्र्याची नांदी झाल्याचे आपणाला दिसून येते.
कार्यक्रमास फलटण व पंचक्रोशीतील विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, संपादक उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!