फलटण : सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. आगामी काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व रोबोटिक्स हे काळाची गरज बनणार आहे आणि हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी ग्रामीण भागातील माझा प्रत्येक विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे, तो मागे राहता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी केले.
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण व एअर गुरुजी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ), कोडींग, ड्रोन, रोबोटिक्स क्षेत्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सविता सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी, सौ.ज्योती सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, सी एल पवार, प्रकाश तारळकर, गुरुजी इंटरनॅशनल इंडियाचे प्रताप पवार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आपली कल्पनाशक्ती व तांत्रिक माहिती यावर आधारित केलेले प्रयोग मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाद्वारे प्राप्त झाली आहे. फलटण येथे तालुकास्तरावर प्रथमच अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपले दर्जेदार प्रयोग सादर केले आहेत, ते पाहून अन्य विद्यार्थ्यांना यामधून निश्चितपणे प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करून श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये जुलै २०२४ मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स यांचे शिक्षण देणाऱ्या लॅबची सुरूवात करण्यात आली. आगामी जून महिन्यापासून बाहेरील शाळा व बाहेरील विद्यार्थी यांनाही कशा पद्धतीने यामध्ये समाविष्ट करून घेता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्याचबरोबर येथे अन्य छोटे व मोठे कोर्सेसही सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
विज्ञान हा मानवाला मिळालेला प्रभावी डोळा आहे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये सातारा जिल्ह्यात प्रथमच फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा म्हणून एअर गुरुजी इंटरनॅशनल लॅबची सुरुवात केली. भारतातील
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या वाढत्या प्रभावाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढविणे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीतम घडामोडींची माहिती करून देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस बी थोरात यांनी प्रस्तविकात सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सविता सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला.
प्रदर्शनातील यशस्वी स्पर्धक पुढील प्रमाणे
▪️ इयत्ता चौथी ते सातवी लहान गट
प्रथम क्रमांक – जिल्हा परिषद शाळा काळज व लोणंद,
द्वितीय व तृतीय –
सौ वेणूताई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण
▪️ इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट
प्रथम – यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,
द्वितीय – सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव
तृतीय – सौ. वेणूताई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण
या व्यतिरिक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनातील अन्य २४ उपकरणांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल तगारे व सुजाता पवार यांनी तर आभार प्रदर्शन एस डी यादव यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य, प्राचार्य, उप प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थि होते.