फलटण : कै. नरसिंगराव (आप्पा) खाशाबा भोईटे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेला मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे. सदर उपक्रम त्यांचे चिरंजीव डॉ. विठ्ठल भोईटे यांनी अगामी काळातही चालू ठेवून सामाजिक कार्याचा वारसा जोपसावा अशी अपेक्षा आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटी, सातारा, ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बू., नंदादीप हॉस्पिटल, सांगली, नॅब हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली ता. कोरेगाव येथे गुरुवार दि. ९ रोजी कै. नरसिंगराव (आप्पा) खाशाबा भोईटे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, डॉ. विठ्ठल भोईटे, पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय धुमाळ, वाघोलीच्या सरपंच सौ.अमिता भोईटे, पिंपोडे बु. च्या सरपंच सौ.दिपिका लेंभे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सदर शिबिरामध्ये वाघोली व परिसरातील सुमारे साडेसातशे नागरिकांनी सहभाग नोंदवीला. यामधील २७ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून असून त्यांना विशेष वाहन व्यवस्था करून शास्त्रक्रियेसाठी सांगली येथे पाठविण्यात आले आहे.
कार्यक्रमास शहाजी तात्या भोईटे, अमित रणवरे, दिपक पिसाळ,पोपट पिसाळ, सुर्यकांत निकम, सागर लेंभे, मनोज अनपट, राजेंद्र धुमाळ, सतीश धुमाळ, शिवजी भोईटे, योगेश करपे आदींसह वाघोली व परिसरातील नागरिक व रुग्ण मोठ्या संख्येने उपास्थित होते.