फलटण : फलटण येथील जोशी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ७ वर्षे सातत्य राखून प्रत्येक वर्षी ‘आपली फलटण मॅरेथॉन’ स्पर्धा अधिकाधिक व्यापक केली आहे. या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. अगामी काळात ‘आपली फलटण मॅरेथॉन’ स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या असे प्रतिपादन आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., आणि फलटण रोबोटीक सेंटर आयोजित आपली फलटण मॅरेथॉन २०२४ – २५ या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेते महेश मांजरेकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मिलिंद नेवसे, दादासाहेब चोरमले, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धक सादिया सय्यद, प्रा. शामराव जोशी, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी यांची उपस्थिती होती.
गड चढून उतरण्याच्या स्पर्धांचे आयोजन करा
फलटण शहरानजिक असलेल्या संतोषगड, वारुगड, जरंडेश्वर व इतर गड चढून उतरण्याच्या स्पर्धेचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना तरुणांनी भरपूर व्यायाम करावा, निरोगी आरोग्य जगावे असे आवाहन आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
फलटण मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या
डॉ. प्रसाद जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ७ वर्षे सातत्य राखून प्रत्येक वर्षी या स्पर्धेला अधिक चांगले स्वरुप देण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद निश्चित कौतुकास्पद असल्याचे सांगताना सातारा मॅरेथॉन ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण मॅरेथॉन स्पर्धेत राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धकांचा सहभाग नोंदवून डॉ. प्रसाद जोशी यांनी फलटण मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याकरता प्रयत्न करावेत यातच आपल्याला खरा आनंद असल्याचेही आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
प्रत्येक वर्षी स्पर्धकांची संख्या वाढते आहे
प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात गेल्या ७ वर्षात आपली फलटण मॅरेथॉन मध्ये विविध वयोगटातील स्पर्धक, विशेषतः आपण ज्यांचे सांधे रोपण केले ते वयोवृध्द स्त्री – पुरुष स्पर्धक आत्मविश्वासाने या स्पर्धेत सहभागी होतात, नव्याने रोबोटीक यंत्रणेद्वारे सांधे रोपण केलेले स्पर्धक ही यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले हे प्रेरणादायी असून त्यामुळेच प्रतिवर्षी स्पर्धकांची संख्या वाढत असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
गटनिहाय प्रथम ३ क्रमांकांचे विजेते स्पर्धक खालील प्रमाणे :
▪️ ५ कि. मी. १८ ते ३० वयोगट पुरुष –
अतुल बर्डे, कृष्णात अलगुडे, नवनाथ दडस.
▪️ ५ कि. मी. १८ ते ३० वयोगट महिला – रुतुजा जगताप, प्रतिक्षा शिंदे, पल्लवी लबडे.
▪️ ५ कि.मी. ३१ ते ४५ वयोगट पुरुष – चिंतामण गायकवाड, प्रशांत अल्डर, श्रीकांत इंगळे.
▪️ ५ कि.मी. ३१ ते ४५ वयोगट महिला – सुरेखा कांबळे, कृष्णात अलगुडे, मनीषा तावरे.
▪️ ५ कि. मी. ४६ ते ६४ वयोगट पुरुष – अरविंद नलवडे, रमेश लोखंडे, माणिक जाधव.
▪️ ५ कि. मी. ४६ ते ६४ महिला – सुनिता अरगडे, पद्मा म्हेत्रे, सुनंदा बागल.
▪️ १० कि. मी. १८ ते ३० वयोगट पुरुष – निशांत सावंत, मनोज मोरे, सोहम लावंड.
▪️ १० कि. मी. १८ ते ३० वयोगट महिला – निकिता मोरे, स्वराज माने.
▪️ १० कि. मी. ३१ ते ४५ वयोगट पुरुष – योगेश जाधव, चिंतामणी देशमुख, पंकज जाधव.
▪️ १० कि. मी. ३१ ते ४५ वयोगट महिला – स्मिता शिंदे, नेहा गलांडे, धनश्री तोडकर.
▪️ १० कि. मी. ४६ ते ६४ वयोगट पुरुष – रमेश चिविलकर, विठ्ठल अरगडे, माणिक कांबळे.
▪️ १० कि. मी. ४६ ते ६४ वयोगट महिला – नेहा पंडीत, अनिता माने, संगीता सातव.
▪️ १५ कि. मी. १८ ते ३० वयोगट पुरुष – विकास पोळ, गौरव पवार, वैभव गायकवाड.
▪️ १५ कि. मी. १८ ते ३० वयोगट महिला – आकांक्षा सोनिया, बुशारा काजी.
▪️ १५ कि. मी. ३१ ते ४५ वयोगट पुरुष –
विशाल कांबीरे, धोंडिबा गिरडवाड, किशोर शिंदे.
▪️ १५ कि. मी. ३१ ते ४५ वयोगट महिला – अलमस मुलाणी, डॉ. सोनिया शहा, स्वागता शिंदे.
▪️ १५ कि. मी. ४६ ते ६४ वयोगट पुरुष – रविंद्र जगदाळे, अतुल गायकवाड, मिस्टर मिजार.
▪️ १५ कि. मी. ४६ ते ६४ वयोगट महिला – संगीता उबाळे, मंजुषा शिंगाडे, निलिमा झारगड.
▪️ ३ कि. मी. ६४ च्या पुढील वयोगट महिला – कल्पना जाधव, सुमन जाधव, श्रध्दा जाधव.
प्रत्येक गटातील पहिल्या ३ विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.