फलटण : क्रांतीजोती सावित्रीमाई यांचे राष्ट्रीय सेवावृत्तीचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. गर्भातील मुली ते वयातील कन्या सुरक्षित ठेवण्यासाठी संस्कार अन् सावित्रीमाईच्या विचारांची गरज आहे. चांगला वाईट स्पर्शज्ञान शिकवणारी सावित्रीमाई घराघरांत हवी आहे. असे प्रतिपादन कथाकार, प्रबोधनकार प्रा रवींद्र कोकरे यांनी केले.
संत सावता माळी तरूण मंडळ तिरकवाडी (फलटण) येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई व्याख्यानमालेच्या शुभारंभी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा कोकरे बोलत होते. १९४ वी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त आदिती पिसे, प्रणिती शिंदे, दिपाली धोटे या तिन्ही मुलींनी सावित्रीमाईच्या वर ओव्या गायन, भाषण खूप चांगल्या पद्धतीने करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
घराघरांत सावित्रीच्या विचारांची गरज आहे. सत्यवान सावित्रीच्या पुराणकथे पेक्षा महात्मा फुले व सावित्रीमाई यांच्या वास्तवतेचे जनजागरण होणे आवश्यक आहे. मुला मुलींत भेदभाव न करता दोन्हींना ही समानतेची वागणूक, शिकवण, संस्कार देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन प्रा कोकरे यांनी केले.
प्रा कोकरे सरांनी व्याख्यानांमधून सावित्रीमाईचे चरित्र अन् चारित्र्य अगदी सहजपणे साध्या सोप्या भाषेत व्यक्त करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रंचालन गजानन बोराटे यांनी केले. व्याख्यानांस मोठ्या प्रमाणात मुली, महिला व श्रोता वर्ग उपस्थित होता.