फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय कुस्ती स्पर्धा (पुरुष) बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण जि. सातारा येथे नुकत्याच यशस्वीरीत्या पार पडल्या.
सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवडचे कुस्तीपटू आण्णा प्रताप मदने (७४ किलो वजन गटामध्ये) फ्री स्टाईल प्रकारामध्ये दुसरा क्रमांक, समाधान आप्पा खांडेकर याने (७४ किलो वजन गटामध्ये) तृतीय क्रमांक मिळवला आहे. सागर खाडे (७७ किलो वजन गटामध्ये) ग्रीको रोमन या क्रीडा प्रकारांमध्ये दुसरा क्रमांक व किरण शेंबडे याने (८२ किलो वजन गटामध्ये) तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या यशस्वी खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजेत्या संघाचे फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर, खजिनदार हेमंत रानडे, महाविद्यालय विकास समितीचे व्हा. चेअरमन व फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य ॲड. पृथ्वीराज राजेमाने, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, फलटण क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, महाविद्यालय विकास समिती सदस्य नितीन दोशी, सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय दीक्षित, सर्व सी. डी. सी. सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.