फलटण : उमलत्या वयातील मुलांसाठी सामाजिक, भावनिक कौशल्यावर आधारीत शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करीत या क्षेत्रातील इंटरनॅशनल ट्रेनर डॉ. ज्योती तोष्णीवाल यांनी शिक्षकांच्या कार्यशाळेत दोन दिवस सविस्तर मार्गदर्शन केले.
लायन्स इंटरनॅशनल तर्फे सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी, फलटण येथे शिक्षकासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यशाळेत २१ शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन रिजन चेअरमन ला. दिलीप वहाळकर सातारा, यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आले. त्यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता लायन डिस्ट्रिक्ट ३२३४ ड १ चे प्रांतपाल एमजेफ लायन ॲड. एम. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली, त्यांनी प्रशिक्षीत शिक्षकांना लायन्स इंटरनॅशनलचे प्रमाणपत्र देऊन गौरविले. यावेळी सरस्वती शिक्षण संथेचे आधारस्तंभ पांडुरंग पवार व व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्रांतीय प्रशासकीय अधिकारी ला. गंगाप्रसाद बंडेवार, महात्मा फुले शिक्षण संस्था फलटणचे अध्यक्ष संदिप चोरमले, डिस्ट्रिक्ट चेअरमन ला. रणजित निंबाळकर, ला. सुहास निकम, ला. चंद्रकांत कदम, लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा ला. स्वाती चोरमले, खजिनदार ला. सिता जगताप, प्रोजेक्ट को – ऑर्डीनेटर ला. उज्वला निंबाळकर, ला. सुनंदा भोसले, ला. सुनिता कदम, ला. दिपा निंबाळकर, ला. दिपा शिंदे उपस्थित होते.
यावेळी लायन क्वेस्ट प्रकल्प कायम स्वरुपी राबविणार असलेचे संस्थेने जाहीर केले व कायम स्वरुपी प्रकल्पाचे उदघाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ॲड. ला. एम. के. पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेचे आयोजन लायन्स क्लब फलटण गोल्डन अध्यक्षा लायन सौ. स्वाती चोरमले यांनी केले, तर सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका व क्लबच्या सचिव सौ. संध्या गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिक्षक कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब फलटण गोल्डन व प्रोग्रेसिव्ह काँन्व्हेट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.