फलटण : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा , फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती ,फलटण जिमखाना फलटण तसेच फुटबॉल असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, फलटण येथे शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा
उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेचा शुभारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य शिवाजीराव घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुधीर अहिवळे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सदस्य महादेव माने, सीनियर फुटबॉल खेळाडू संजय फडतरे आदींची यांच्या उपस्थिती होती.
या प्रसंगी सुधीर अहिवळे व शिवाजीराव घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक क्रीडा प्रशिक्षक सचिन धुमाळ यांनी, सूत्रसंचालन तायाप्पा शेडगे यांनी केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी फुटबॉल प्रशिक्षक अमित काळे, अमोल नाळे, सुहास कदम तसेच सर्व वरिष्ठ फुटबॉल खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.
या वेळी पार पडलेल्या स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलने सतरा वर्षांखालील मुली आणि मुले अशा दोन्ही गटात प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी झालेल्या अंतिम सामन्यात मुलांच्या संघाने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण संघाला २-० गोल ने पराभूत केले. मुलींच्या संघाने श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज एसएससी च्या संघाचा २-० असा पराभव केला.
एकोणीस वर्षाखालील वयोगटात मुलांच्या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलच्या संघाने श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम सीबीएसई संघाचा ५-० असा पराभव केला तर मुलींच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएससी च्या संघाने अंतिम सामन्यात बाजी मारली.