फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी पाडेगाव ता. खंडाळा येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला व सेंद्रिय शेती बद्दल व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्याख्यानात ज्ञानेश्वर भोसले यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांना शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर कसा करायचा व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती माल उत्पादन करणे बाबत मार्गदर्शन केले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित, समन्वयक प्रा. निलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत धनंजय इंगोले, राहूल केसकर, सौरभ काटकर, रोहन कांबळे, आदित्य गोडसे, श्रीजीत धुमाळ, शिवतेज रणवरे यांनी हा उपक्रम पार पडला.