फलटण : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषि महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी पाडेगाव फार्म ता. फलटण येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
यावेळी आर्यन जगताप, विराज तोडकर, प्रतिक चौधरी, प्रज्वल यादव, सुजित म्हेत्रे, अमित फाळके, श्रीतेज कोलते, निखिल गोवेकर या कृषिदूतांनी येथील बाळासाहेब जाधव यांच्या गोठ्यात शेतकऱ्यांसमवेत विविध विषयांवर प्रात्यक्षिक दाखविली. त्याचबरोबर गोठ्याची व जनावरांच्या निवाऱ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर प्रात्यक्षिक व त्याची आवश्यकता व महत्व पटवून दिले. या वेळी महेश जाधव, बाळासाहेब जाधव, रामचंद्र जाधव, राणी जाधव, लक्ष्मण गोरे, उषा जाधव, भिकाजी नाळे,आदी पशुधन पालक शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित, समन्वयक प्रा. निलिमा धालपे व प्रा. स्वप्नील लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रात्यक्षिक पार पडले.