किल्ले प्रतापगड संवर्धन कामाची पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी

फलटण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात प्रतापगड कसा होता, हे गड पाहायला येणारे विद्यार्थी, युवा पिढी व पर्यटक यांना दिसला पाहिजे हा आमचा उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाची संवर्धन कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा साक्षीदार असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली व तेथे सुरु असलेल्या शिवसृष्टी कामाची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, विजय नायडू आदींची उपस्थिती होती.
किल्ले प्रतापगड ऊर्जा स्त्रोत असून प्रतापगडाच्या संवर्धन कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी प्रतापगड संवर्धनाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, प्रतापगड संवर्धनाचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा प्रतापगड किल्ला होता त्याच पद्धतीने काम व्हावे. कामात कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्या. या कामासाठी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करावे. त्यांची कोणतीही प्रकारे गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेतली जाईल, असेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात प्रतापगड संवर्धनाचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यामध्ये आणखीन आवश्यक बाबींचा समावेश करायचा आहे काय या बाबत येथील आमदार व मंत्री मकरंद पाटील यांच्या समवेत मुंबई अथवा महाबळेश्वर येथे बैठक लावू तसेच स्थानिक ग्रामस्थांना कोणतीही गैरसोय व अडचण होणार नाही अशी ग्वाहीहि यावेळी ना. शंभराज देसाई यांनी दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!