फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटण यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘श्री शारदा पुरस्कार’ पुणे येथील शिक्षणतज्ञ व व्यवस्थापनतज्ञ डॉ. सौ. प्रतिभा मनोहर जोशी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा वर्धापन दिन व सदर पुरस्कार वितरण समारंभ नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मृणालिनी आवटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शिल्पा इनामदार व फलटण केंद्राचे प्रमुख विजय ताथवडकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शारदा व भगवान परशुराम यांच्या प्रतिमांचे यांचे पूजन करण्यात आले.
डॉ. प्रतिभा जोशी यांना ‘श्री शारदा पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. केंद्रप्रमुख विजय ताथवडकर उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक केले. प्रमुख मान्यवरांचा परिचय डॉ.माधुरी दाणी, सौ. मंगल चरेगावकर यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल केसकर यांनी केले तर आभार चंद्रशेखर दाणी यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ. प्रसाद जोशी, मनोहर जोशी, जयश्री जोशी, प्रा. विक्रम आपटे यांचेसह निरा व लोणंद केंद्राचे पदाधिकारी व फलटण येथील निमंत्रित, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.