रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माढ्याचा खासदार करने माझे उद्दिष्ट ; आमदार सचिन पाटील यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा – आ. जयकुमार गोरे

फलटण : महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमदार सचिन पाटील फलटण विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांना निवडून आणण्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. भविष्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माढ्याचा खासदार झालेला पाहणे हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टेनेच आम्ही अगामी वाटचाल करीत आहोत असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांच्या कोळकी ता. फलटण येथील निवासस्थानी आमदार जयकुमार गोरे यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोळकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काशीद, संदीप नेवसे, यशवंत जाधव, जेष्ठ विधीतज्ञ ॲड. पी. जी. देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
आमचा विरोध येथील प्रवृत्तीला होता. अशा प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी अनेक गोष्टींचा तह करावा लागतो, तडजोडी कराव्या लागतात, तर कधी चार पावले पाठीमागे यावे लागते, या सर्व गोष्टींचा विचार करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीत जो निर्णय घेतला, तो फलटण तालुक्याच्या हिताचा होता. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे व आमदार सचिन पाटील आम्ही सर्वजण योग्य तो समन्वय राखून काम करू, आम्ही प्रत्येकजण आपआपला पक्ष वाढवण्याची भूमिका घेतोय ती व्यवस्थितरित्या पार पाडू असे स्पष्ट करून आ. गोरे म्हणाले, फलटण तालुक्यातील जनतेने केलेले परिवर्तन हे वाया जाणार नाही, हे परिवर्तन मोठ्या प्रमाणात विकासाच काम करेल. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. त्यांचे प्रयत्न व जनतेचे पाठबळ यामुळे फलटण विधानसभा मतदार संघातून आमदार सचिन पाटील हे विजयी झाले आहेत. एक चांगला सहकारी माझ्यासोबत विधानसभेत येतोय याचा मला अभिमान आहे. गेली वीस वर्ष मंत्रीपद असताना देखील आजही फलटण तालुका पूर्णपणे दुष्काळ मुक्त झाला नाही. परंतु आता आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळी भागाला न्याय मिळेल व विकासाला चालना मिळेल. फलटण तालुक्याच्या विकासाचे जे स्वप्न रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहिले आहे ते आता आमदार सचिन पाटील यांच्या रूपाने पुढे जाईल असा विश्वासही आमदार गोरे यांनी यावेळी व्यक्त केला. मंत्रिपद मिळण्याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही लढणारे नेते आहोत रडणारे नव्हे. संघर्ष करून मिळवणारे आम्ही नेते आहोत. आम्ही दोघे नेहमी एकमेकांसोबत असतो त्यामुळे आमची वेगळी भूमिका कधीही नसते. त्यामुळे माझ्या मित्राला एक चांगली संधी मिळावी ही माझी कायमपणे भावना असेल परंतु भविष्यामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माढ्याचा खासदार झालेला पाहणे हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टेनेच आम्ही आगामी वाटचाल करीत आहोत.
प्रारंभी जयकुमार शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते आमदार जयकुमार गोरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार शत्रुघ्न जाधव, भाजपचे शहाराध्यक्ष अमोल सस्ते, सुधीर अहिवळे, अजय माळवे, संदीप चोरमले, संजय गायकवाड, आर. डी. पवार, रियाज इनामदार, सुनील सस्ते, रणजित जाधव, गोरख जाधव, प्रदीप भरते, विष्णू फडतरे, आनंदराव शिंदे, अभिजित शिंदे, गणेश मोरे, सागर भोसले, रोहन शिंदे, सचिन हजारे, गणेश वाकोडे, नितीन काटकर, महेश गायकवाड, प्रशांत काळे, पै. रणजित काशीद, दिनेश शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.

मातीशी इमान राखणारे नेतृत्व न मिळाल्याचे जनतेला शल्य !
” फलटणचे नेतृत्व गेल्या पंधरा वर्षापासून मला राजकारणामधून संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांची वैचारिक अधोगती झाली. दिवसेंदिवस त्यांनी सुडाचे राजकारण केले. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मातीतला खासदार होत आहे याच देखील भान त्यांना राहिले नाही. जनतेने आता त्यांचे कारनामे ओळखले आहेत. येथील जनतेला मातीशी इमान राखणारे नेतृत्व पाहिजे होते तसे नेतृत्व गेल्या तीस वर्षात येथील जनतेला मिळाले नाही याच शल्य कायमपणे जनतेला राहील अस माझ ठाम मत आहे, ” अशी प्रतिक्रिया आमदार जयकुमार गोरे यांनी कोणाचेही नाव न घेता व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!