निंभोरे येथे सुंदर चैत्यभूमी साकारणार ; आ. सचिन पाटील यांचे अश्वासन

फलटण : महाराष्ट्रामध्ये निंभोरे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. त्यामुळे निंभोरे या पवित्र भूमीत अगामी काळात अतिशय सुंदर चैत्यभूमी साकार करू व त्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी दिले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आमदार सचिन पाटील यांनी निंभोरे तालुका फलटण येथे भेट देऊन बाबासाहेबांच्या अस्थीकलशाला अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत महानंदा दूध संघाचे माजी संचालक डी. के. पवार, अमित रणवरे, राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, सनी काकडे, सनी मोरे, विकी बोके आदी भीम सैनिक उपस्थित होते.

दरम्यान आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, जाकीरभाई मणेर, शहाराध्यक्ष अमोल सस्ते, राजेश हेंद्रे, अमीरभाई शेख आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!