निकिता वेताळ व तेजस्विनी कर्वे यांची सब जुनिअर महाराष्ट्र हॉकी संघात निवड – महेश खुटाळे

फलटण : दी हॉकी सातारा संघटनेच्या खेळाडू निकिता वेताळ व तेजस्विनी कर्वे यांची सिकंदराबाद येथे होणाऱ्या सब ज्युनिअर महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या हॉकी संघामध्ये निवड झाली असल्याची माहिती संघटनेचे सचिव तथा निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी दिली आहे.
हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्यावतीने सब ज्युनियर महिलांचे पिंपरी चिंचवड येथील एस्ट्रोटर्फ मैदानावरती महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता दि हॉकी सातारा संघटनेच्या कु. तेजस्विनी कर्वे, कु. श्रेया चव्हाण, कु. अनुष्का केंजळे व कु. निकिता वेताळ अशा चार खेळाडूंची निवड झालेली होती. त्या मधील निकिता वेताळ व तेजस्विनी कर्वे यांची सिकंदराबाद येथे होणाऱ्या सब ज्युनिअर महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या हॉकी संघामध्ये निवड झालेली आहे.
या खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे व हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ हे प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणामध्ये बी. बी. खुरंगे हे सहाय्य करीत आहेत.
या निवडीबद्दल खेळाडू व प्रशिक्षकांचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, मधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहिवळे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, पंकज पवार, प्रवीण गाडे, विजय मोहिते, महेंद्र जाधव, सचिन लाळगे, शिरीष वेलणकर, सुजीत निंबाळकर आदींनी अभिनंदन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!