फलटण : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण सन २०१२ पासून यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन सदगुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या सहकार्याने दरवर्षी दि. २५ नोव्हेंबर रोजी आयोजन करत असते. परंतु यावर्षी नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक व अन्य काही अपरिहार्य कारणांमुळे दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजीचे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले नसल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. यावर्षी या संमेलनाचे एक तप पूर्ण होत आहे. परंतु लवकरच डिसेंबर २०२४ मध्ये या संमेलनाचे शानदार संयोजन निश्चितपणे केले जाईल, असेही रविंद्र बेडकिहाळ यांनी पत्रकात म्हटले आहे.