फलटण : फलटण विधानसभा मतदार संघातील धुमाळवाडी ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेतील जय किसान मतदान केंद्रास निवडणूक निरीक्षक नुह.पी.बावा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राची पाहणी करून फाळांची थीम उत्कृष्ट असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
या मतदान केंद्रामध्ये जांभूळ, अंजीर, सीताफळ, आवळा, आंबा, पपई, खरबूज, फणस, चिक्कू, डाळिंब, संत्री, ड्रॅॅगन फ्रूट, द्राक्षे, आदी फळाची माहिती व त्यापासून होणारा लाभ याविषयी माहिती देणारे माहिती फलक लावण्यात आले होते, ते वाचून बावा यांनी समाधान व्यक्त केले, तसेच त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या डाळींब,सीताफळ अंजीर, चिक्कू,आवळा पेरू अशा विविध फळांच्या टोकरी, नैसर्गिक वारसा लाभलेल्या गावाची माहिती, धबधबा छायाचित्रे व फळांच्या सेल्फी पॉईंटचे कौतुक करून स्वीप टीमचे अभिनंदन केले. जास्तीत जास्त मतदार या केंद्राकडे आकर्षित करून मतदानाचा टक्का वाढावा हा मुख्य उद्देश आदर्श केंद्र स्थापन करणे होते उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या उत्सवामध्ये मतदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव व इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.