फलटण : मी एक बहुजन समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. परंतु एक शेतकऱ्याच, रेशनिंग दुकानदाराचं पोरग उठलं आणि लोकांची काम करायला लागलं बघता बघता लोक त्याच्या मागे जायला लागले. बघता बघता जिल्ह्यामध्ये वादळ तयार झालं आणि यांच्या साम्राज्याला धोका निर्माण झाला. त्यामुळेच ते माझा द्वेष करत आहेत. एखाद्या सामान्य कुटुंबातल्या एका बहुजनाच्या पोरानं राजकारण करायचं म्हणलं तर यांचं पित्त उसळतं मग यांना बहुजनांची मतं कशी चालतात असा सवाल आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ विडणी तालुका फलटण येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, युवा नेते शिवरूप राजे खर्डेकर सचिन पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख नानासो इवरे, विडणीचे सरपंच सागर अभंग आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचे राजकारण चाललेलं आहे त्याने लोकशाहीचा अंत झाला आहे. या विधानसभा निवडणुकीत जनतेसमोर जात असताना विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही, जर असेल तर त्यांनी त्यांच्याकडे कोणता विकासाचा मुद्दा आहे हे सांगाव असे आवाहन करून आ. गोरे म्हणाले, फलटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही संपलेले होती लोप पावलेली आहे. येथील नेतृत्वाने या तालुक्यात, मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांमध्ये लोकशाहीचा गळा घोटून सामान्य माणसाच्या मताला कोणतेही महत्त्व न देता मी करेल तो कायदा, मी बोलेल तो शब्द अशा पद्धतीची भूमिका घेऊन सामान्य माणसाच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या मताला ना कधी मान दिला, ना या मातीला मान दिला. जो खासदार या मातीच्या पाण्यासाठी, विकास कामे आली पाहिजेत म्हणून व औद्योगिक वसाहत निर्माण करून हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरिता लढत होता व या सर्व कामाला मूर्त स्वरूप देत होता, त्या या फलटणच्या मातीच्या सुपुत्राचा पराभव करण्याचे पाप त्यांनी केल आहे.
जो माणूस एकोणीस वर्ष मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे, सात वर्ष विधान परिषदेचे सभापती पद भोगलं आहे. सभागृहातलं सर्वोच्च पद तुमच्याकडे असताना जर तुम्ही ठरवलं असतं तर या फलटण विधानसभा मतदारसंघातल एकही विकासाचे काम शिल्लक राहिलं नसत. पाण्याच्या प्रश्नाबाबत सभापती म्हणून जर त्यांनी आग्रह केला असता, निरा देवघरचे पाणी देण्यासाठी फलटण तालुक्यात जे कॅनॉलचे काम राहिलेल आहे, शासनाने त्याला तातडीने हजार कोटी रुपये मंजूर करावेत. परंतु त्यांनी याबाबत एकही शब्द कधीही काढला नाही असा आरोप गोरे यांनी आ. रामराजे यांच्यावर नाव न घेता केला. त्याच बरोबर फलटण तालुक्यात नीरा देवघर चे पाणी आले पाहिजे, रेल्वे आली पाहिजे, नवीन औद्योगिक वसाहत निर्माण झाली पाहिजे परंतु विकासाबाबत बोलताना ते कमिन्स व्यतिरिक्त अन्य काही बोलत नाहीत पण या कमिन्स मध्ये काय चालतं हे अलीकडच्या काळात उघड झाला आहे. कमिन्स ही एक त्यांची घर चालवणारी संस्था असल्याचे सांगत गेल्या अठरा
महिन्यांमध्ये विडणी गावचे सरपंच सागर अभंग हे गावात सत्तर कोटी रुपयांचं काम करू शकत असतील तर तर आमदार, मंत्रीपद व सभापती पद असताना यांनी किती काम करायला पाहिजे होते असा सवाल गोरे यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमुळे अनुसूचित जातीला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली परंतु गेल्या पंधरा वर्षात तुम्ही जो आमदार निवडून दिला तो तुम्हाला दिसला का असा सवाल उपस्थित करून जे आमदार झाले परंतु त्यांना कधीही आमदारकीचा वापर करू दिला नाही व भविष्यातही करू देणार नाहीत. त्यामुळे आता भूमिका घ्यावी लागेल. या तालुक्याचा विकास, या तालुक्यातील जनतेचा सन्मान राखण्यासाठी आता भूमिका घ्यावीच लागेल, ती बदलावी लागेल या तालुक्यातील लोकशाही पुन्हा जिवंत करावे लागेल त्यासाठी घड्याळ चिन्हा शेजारचे बटण दाबून महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी फलटणच्या जनतेला केले.
मराठा आरक्षणाबाबत त्यांनी सभागृहात किती आवाज उठवला ?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या महोदयांनी सभागृहामध्ये एकही शब्द काढला नाही. जर काढला असेल तर त्याचा व्हिडीओ त्यांनी दाखवावा, मी माझे किमान दहा तरी व्हिडीओ दाखवतो असे आवाहन आ. गोरे म्हणाले,
मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल यांनी सभागृहामध्ये एकही शब्द काढला नाही. मीही त्या सभागृहाचा गेली पंधरा वर्षांचा साक्षीदार आहे. जर त्यांनी मराठा आरक्षणाबाबत एक जरी शब्द काढला असला तर तुम्ही सांगाल ते ऐकीन, परंतु ते ही नाही. ते मराठा, धनगर कुणाचेच नाहीत. जे समाजा समाजामध्ये द्वेष पसरवितात, भांडण लावतात व तुम्हाला कायम हिन मानतात कोणत्याही समाजाचा उल्लेख सन्मानाने करत नाहीत अशी इथली अवस्था असल्याचा आरोप गोरे यांनी यावेळी केला.