रामराजे यांचे कर्तृत्व मोठे ; दीपक चव्हाण यांना विजयी करून इतिहास घडवूया – खा. शरद पवार

फलटण : फलटण आणि बारामती यांच एक वेगळं नातं आहे अनेक वर्षांपासूनच नातं आहे येथील रामराजे नाईक निंबाळकर यांचा अतिशय जागरूक व लोकांच्या प्रश्नाशी बांधिलकी असणारे आणि या भागातील लोकांच्या शेतीला पाणी कसे देता येईल यासाठी अभ्यासू आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. एकमेकांचे राजकीय मतभेद असतात परंतु एकमेकांचा सन्मान ठेवायचा असतो असे सांगून फलटण विधानसभा मतदार संघात दीपक चव्हाण यांच्या सारखा प्रामाणिकपने कष्ट करण्याची तयारी असणार उमदा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर मोठ्या मताने त्यांना विजयी करून आपण इतिहास घडवूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
फलटण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित फलटण येथील जाहीर सभेत, ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवरांसह मित्र पक्षांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बारामती अथवा फलटण यांच्या बदलाच श्रेय जर द्यायचा असेल तर ते खऱ्या अर्थाने श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना द्यावे लागेल. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खाते होते. त्याच्यामध्ये रस्ते होते, बांधकामही होत, पाणी, कॅनॉल या संबंधीचा सुद्धा अधिकार होता. आणि या सगळ्या भागाकडे महाराज साहेबांनी अतिशय आत्मियतेने पाहिल. फलटण बारामती इंदापूर अथवा पंढरपूरचा भाग असा भेदभाव न करता त्यांनी विचार केला की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल कसा करता येईल असा एकच दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे या भागावरती त्याचा झालेला परिणाम व येथे आलेली सुव्यवस्था याचे श्रेय महाराज साहेबांना द्यावे लागेल असे स्पष्य करू पवार म्हणाले, कृष्णा खोरे हा आपल्या भागाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे. कृष्णा खोऱ्याची प्रगती ही पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची प्रगती करणारी होती. आणि त्या कामाची जबाबदारी रामराजे यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्या कालखंडामध्ये या कार्याला गती मिळाली आणि त्याचे परिणाम सातारा जिल्हा असो पुणे जिल्हा असो अथवा या महामंडळाच्या अखत्यारीत येणारे जिल्हे असोत तेथे आपल्याला पहायला मिळतो. अलीकडचा काळ बदलला राज्य बदलली नव नेतृत्व आलं मला स्वतःला तुम्ही लोकांनी महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी दिली, मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, अनेक काम करण्याची संधी दिली. जशी मला संधी मिळाली तसेच ती रामराजे यांनाही मिळाली आणि त्यांनी त्यांच कर्तृत्व दाखवलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून कुणाच्याही मदतीशिवाय निवडून आले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून लढवल्या व जिंकल्या असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

त्यांच बोलणं म्हणजे एक गंमतच..!

गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा साखरवाडी येथे संपन्न झाली. त्या सभेत त्यांनी रामराजे यांच्यावर अनेकदा उपहासात्मक टीका केली व त्यामध्ये आपणच त्यांना आमदारकीचे तिकीट दिल्याचे वक्तव्य केल्याचे आपणास समजले असल्याचे सांगत पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना सांगितले, रामराजेंना मी आमदार केल म्हणतात ही मोठे गमतीची गोष्ट आहे. पक्षाचा अध्यक्ष मी, कुणाला तिकीट द्यायच हा अधिकारही माझ्याकडे, ज्यांनी रामराजेंना आमदार मी केल असं सांगितलं त्यांनाही पहिल तिकीट मीच दिल, त्यांना राजकारणामध्ये, मंत्रिमंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं, आणि त्यांनी सांगावं की रामराजेंना मीच घेतलं. माझं नशीब चांगलं आहे नाहीतर असं सांगितलं असतं की पवार साहेबांना सुद्धा मीच आमदार केल असा टोला मारून किती बोलावं कसं बोलावं यासंबंधी हे योग्य नाही. एकमेकांचे राजकीय मतभेद असतात परंतु एकमेकांचा सन्मान ठेवायचा असतो. रामराजे हे विधिमंडळाचे सभासद आहेत. पदे असतात पदाची प्रतिष्ठा ठेवायची असते. पदाची व व्यक्तीची प्रतिष्ठा आपण ठेवली तर लोक सुद्धा आपल्याकडे त्याच भावनेने बघत असतात. जेव्हा आपण उगीचच कुणावर तरी टीका टिप्पणी करत बसलो तर लोक कदाचित जाहीर बोलणार नाहीत परंतु आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय वेगळा होईल त्यामुळे ही गोष्ट खरी नाही असे सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!