अनुप शहा यांची अनोखी भाऊबीज ; मनोरुग्ण महिलेला साडी- चोळी व दिवाळीचा फराळ

फलटण : फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे शहाराध्यक्ष अनुप शहा हे आपल्या नानाविध सामाजिक उपक्रमांनी नेहमी चर्चेत असतात. या दीपावली सणाला त्यांनी एका मनोरुग्ण महिलेच्या परिवारसोबत दिवाळी साजरी केली. भाऊबीजेच्या निमित्ताने शहा यांनी त्या महिलेस साडी- चोळी व दिवाळी फराळ देत एक अनोखा स्नेहाचा दीपक फुलावीला आहे. अनुप शहा यांच्या या कृतीचे नागरिकांमधून कौतुक व्यक्त होत आहे.
फलटण शहरातील मारवाड पेठ परिसरात याच भागातील एक मनोरुग्ण महिला मिळेल ते खाऊन कोणाच्याही दारात आपला ठिय्या मांडत असते. ती महिला गेले काही दिवस आजारी असल्याने तीचा पुणे स्थित मुलगा व विवाहित मुलगी तीला भेटण्यास आले होते. आल्यानंतर त्यांनी अनुप शहा यांच्याशी संपर्क साधला. शहा यांनी तेथे भेट दिल्यानंतर त्यांनी तिच्या कुटुंबातील व्यक्तींसह स्थानिक महिलांच्या मदतीने सदर महिलेस स्वच्छ आंघोळ घालण्यासाठी सांगितले. त्यानंतर तीला दिवाळीचा फराळ व भाऊबीजेचे औचित्य साधून नवीन साडी व चोळी भेट दिली. शहा यांच्या या अनोख्या भाऊबीजेचे सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!