बाराजणांची माघार चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात
फलटण : फलटण विधानसभा मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी २६ पैकी १२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान यंदाची निवडणूकीत महायुती, महाविकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष व परिवर्तन महाशक्ती विकास आघाडी अशी चौरंगी लढत पहायला मिळणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रशांत कोरेगावकर, राजेंद्र पाटोळे, विमल भिसे, अमोल अवघडे, बुवासाहेब हुंबरे, जयश्री आगवणे, हिंदुराव गायकवाड, आकाश आढाव, गंगाराम रणदिवे, नंदू मोरे, रवींद्र लांडगे, हरिभाऊ मोरे या अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना सचिन कांबळे-पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ), दिगंबर आगवणे ( राष्ट्रीय समाज पक्ष ),
रमेश आढाव ( स्वाभिमानी पक्ष ) यांचे प्रमुख आव्हान असणार आहे. याशिवाय प्रतिभाताई शेलार ( बसपा ), दीपक चव्हाण रामचंद्र ( सनय छत्रपती शासन ), सचिन भिसे ( वंचित बहुजन आघाडी ), अमोल करडे, ॲड. कांचनकन्होजा खरात, कृष्णा यादव, गणेश वाघमारे, चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव, नितीन लोंढे, सूर्यकांत शिंदे सर्व अपक्ष हे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.