
फलटण : फलटण शहरातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांच्या सहकार्यातुन फलटण शहरातील सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थीनीं, विद्यार्थ्यांना ७० रूपये एमआरपी असणारी “फुल स्केप” वही केवळ २५ रूपयांना मिळणार आहे. दादासाहेब चोरमले यांच्या सहकार्यातून फलटण शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ही सवलत ठेवण्यात आली आहे.
दादासाहेब चोरमले हे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवून अनेकांना मदत करीत असतात. नुकत्याच शाळा चालू झाल्याने चरमले यांनी विदयार्थ्यांसाठी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. गजानन चौक ते तेली गल्ली रस्त्यावर असणाऱ्या न्यु गजराज किराणा स्टोअर्स येथे वह्या उपलब्ध असून विदयार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
