फलटण : रमाई घरकुल निर्माण जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत बैठकीत रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत एकूण ७१४ घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून त्यामध्ये फलटण तालुक्यातील १६० घरकुलांचा समावेश आहे.
या वेळी आमदार सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रकल्प संचालक उपस्थित होते.
सन २०२४-२५ मध्ये रमाई आवास घरकूल योजनेसाठी ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी एक लाख २० हजार रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. या मंजूर घरकुलांना आठ कोटी ५६ लाख ८० हजार रुपये एवढा खर्च येणार आहे. सातारा जिल्हयामध्ये मंजूर केलेल्या घरकुलांचा तालुकानिहाय मंजूर घरकूलांची आकडेवारी पुढील प्रमाणे सातारा १६, कोरेगाव ५३, जावली १८, वाई २२, महाबळेश्वर १५, खंडाळा १४, फलटण १६०, माण ८०, खटाव ७६, कराड १५०, पाटण ११०