फलटण : जिल्हा परिषद सातारा आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तकप्रेम तसेच ‘मला भावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या दोन्ही विषयांवर लहान गटातून इयत्ता चौथीतील वैष्णव विकास खराडे याने प्रथम क्रमांक तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य’ तसेच ‘थोर साहित्यिक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण’ या विषयांवर मोठ्या गटातून इयत्ता सातवीतील श्रावणी सुनील शिंदे हिने अनुक्रमे द्वितीय आणि उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले आहे. तसेच हस्ताक्षर स्पर्धेत इयत्ता सातवीतील कु. हर्षदा विनोद चोपडे हिने दुसरा क्रमांक मिळवीला आहे. क्रिडा स्पर्धा लांब उडी मध्ये सोहम भारत गाढवे याने उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे फलटण तालुकाध्यक्ष सतीश गाढवे यांच्यावतीने वही, पेन देऊन सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अंजना चिरमे व सर्व शिक्षक वृंद यांचेसह गावातील मान्यवर व ग्रामस्थाकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.