फलटण : नांदणी जि. कोल्हापूर येथील
जैन समाजाच्या स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामध्ये पंचकल्याणक महोत्सव उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंचकल्याणक सोहळ्यास भेट देऊन या क्षेत्राला अ वर्ग दर्जा देण्याचे जाहीर केले आहे. पंचकल्याणक कार्यक्रमात कर्नाटक व महाराष्ट्र मधील बहुसंख्य श्रावक- श्रावीकांनी उपस्थित राहुन सोहळ्याचा लाभ घेतला.
या पंचकल्याणक महोत्सवास फलटण मधील प्रसिद्ध १००८ श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर समितीचे सचिव मंगेश दोशी, खजिनदार अरिंजय शहा, ज्येष्ठ विश्वस्त उदय शहा, विश्वस्त राजेंद्र कोठारी, नंदिश्वर दोशी आदींनीही भेट दिली.
यावेळी श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाच्या वतीने श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर विश्वस्तांचा कार्यक्रमस्थळी ऊचित सत्कार करण्यात आला.