साखरवाडी कारखान्याकडे पहिल्या २ पंधरवड्यात गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट प्रति टन ३१०० रुपये प्रमाणे बँक खात्यात जमा

फलटण : श्री दत्त इंडिया प्रा. लि. यांच्या साखरवाडी ता. फलटण येथील साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रति टन ३१०० रुपये देण्याचे जाहीर करुन पाहिल्या व दुसऱ्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कंपनीचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे.
या साखर कारखान्यात दि. १५ नोव्हेंबर ते दि. १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत गाळपास आलेल्या १ लाख १७ हजार २०.८० मे. टन ऊसाला प्रति टन ३१०० रुपये प्रमाणे ३६ कोटी २९ लाख १९ हजार ४८६ रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले आहे.
कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु असून आज अखेर ३ लाख ६३ हजार ९०२ मे. टन ऊसाचे गाळप झाले असून या हंगामात १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवून संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित असल्याचे निदर्शनास आणून देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस श्री दत्त इंडिया प्रा. लि. यांच्या साखरवाडी कारखान्याकडे गाळपास पाठवावा असे आवाहन प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर (फायनान्स) अमोल शिंदे, टेक्निकल हेड अमोद पाल, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी बागनवगर साहेब, युनियन सेक्रेटरी राजेंद्र भोसले व त्यांचे सहकारी मच्छिंद्र भोसले, पोपटराव भोसले, संजय जाधव उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!